Published On : Tue, Feb 4th, 2020

सफाई कामगारांचे बेमुदत कामबंद धरणे आंदोलन

Advertisement

काटोल नगर परिषद मधील सफाई कामगार यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सुरू केलेले आहे.

नॅशनल स्वच्छकार युनियन ऑफ इंडिया व अखिल भारतीय सफाई कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने काटोल नगर परिषद येथील आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी व सफाई रोजंदार कर्मचारी यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून त्याबाबतची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सहा दिवसा अगोदरच सफाई कामगारांनी निवेदन देऊन दिली आहे. सन 2015, सन 2019 व 18 जानेवारी 2020 ला वेगवेगळे निवेदन देवून मागण्याची पूर्तता करण्याची विनंती सफाई कर्मचारी यांनी केली होती. पण सफाई कामगारांच्या मागण्यांकडे मागील पाच वर्षांपासून दुर्लक्ष केल्यामुळे काटोल नगर परिषद मधील आरोग्य विभाग सफाई कर्मचारी व सफाई रोजंदारी (ऐवजदार) कर्मचारी हे आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.

काटोल नगर परिषद मधील 5 सफाई कर्मचारी सक्तीने सेवानिवृत्त केले. त्यांच्या वारसांना वशिला पध्दतीने सेवेत सामावून घेतले नाही. त्यांच्या वारसांना सफाई कामगारांच्या पदावर नियुक्त करावे, काटोल नगर परिषद हदीमधील रहिवाशी परिसर हा दिवसेंदिवस वाढवत आहे. तरी सुद्धा सफाई कामगारांच्या संख्येत वाढ करण्यात येत नाही. काटोल नगर परिषदेमध्ये 87 सफाई कामगार आहे. यातील 10 च्या जवळपास कामगार कार्यालयीन कामात असल्याने 77 च्या जवळपास सफाई कर्मचारी काम करीत आहे. सफाई कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी. शिवाय जीआर नुसार रोजंदार सफाई कामगार याना 512/- प्रमाणे रोज मिळाला पाहिजे पण त्यांना 300 रुपये मिळत आहे. हा आमच्यावर अन्याय असल्याचे सफाई कामगारांनी बोलून दाखविले. आमच्या विविध 15 मागण्या असून त्या पूर्ण करण्याकरिता बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी स्पस्ट केले.

सफाई कामगारांच्या आंदोलनामध्ये नगर परिषद विरोधी गटनेते व अखिल भारतीय सफाई कामगार युनियनचे अध्यक्ष संदीप वंजारी तसेच नॅशनल स्वच्छकार युनियन ऑफ इंडिया चे अध्यक्ष रवींद्र असरेट, सचिव जयंत सारवान, नरेश सारवान, मनोज शेंद्रे, राजेश महानंदे, अजय

महानंदे, दीपक चमके, प्रशांत सारवान, राजू सारवान, प्रमोद बरसे, दुर्गा बरसे, विनोद बरसे, रंजिित असरेट, अरुणा महानंदे, शशी बरसे, राज शेंद्रे, गंगा बलवानेे, मालती चव्हाण, छाया बसरे, माया बैनवार, चंदा चव्हाण, चंदा डिके, रामू घिचेरिया,

मनोज राणे, चेतन महानी, धीरज शेंद्रे, राजेश सारवान, यासह सर्वच सफाई महिला-पुरुष कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.