Published On : Tue, Feb 4th, 2020

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत विद्यार्थ्या नी १० पदक पटकाविले

Advertisement

कन्हान :- नेपाळची राजधानी काठमांडु येथे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कन्हान च्या विद्यार्थ्यी खेडाळुनी १० पदक पट कावित भारतीय तिरंगा झेंडा उचावित देशाचा सन्मान वाढवुन शहराचे नावलौ किक केल्याने कन्हान वासीया व्दारे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

नेपाळची राजधानी काठमांडू येथे शोतोकान कराटे असोशिऐशन नेपाळ (एस.के.आई.एफ.) नेपाळ ओलंपिक कमेटी, नेशनल कॉंन्सिल अॉफ नेपाळ कराटे फैडरेशन द्वारा नैशनल स्पोर्ट्स कॉंन्सिल कराटे अकादमी हॉल, ललितपु र नेपाळ (काठमांडू) येथे आयोजित कर ण्यात आली होती. यात नेपाळ, भुटान, पाकिस्तान व भारताच्या कराटे संघाने सहभाग घेतला असुन भारतीय संघाने ३७ पदक पटकावित आपल्या देशाला गौरवान्वित केले. यात ९ स्वर्ण पदक, १३ रजत पदक आणि १५ काँस्य पदका चा समावेश आहे.

ज्यात ट्रेडेशनल इंटर नेशनल शोतोकान कराटे डु असोशिऐश न इंडिया (T I S K) शाखा कन्हान – कामठी च्या रामाकृष्ण सारदा मिशन प्रायमरी, सेेकेंडरी व ज्यूनियर कॉलेज फॉर गर्ल्स विद्यार्थ्यी कन्हान च्या खेडाळु नी ०२ स्वर्ण पदक, ०२ रजत पदक, ०६ काँस्य पदक असे १० पदक पटकाविले. ज्यात श्रेया राजेन्द्र रासेगावकर इयत्ता ९ वीं, गुंजन गोपाल गोंडाणे इयत्ता ४ थीं, सिध्दार्थ योगेश्वर फुलझेले २ री, परी कांतिलाल झाडे ५ वीं, साक्षी संतोष चरडे ९ वीं, अदिती राकेश गौरखेडे ७ वीं, यशस्वी योगेश चकोले ६ वीं, अतुल दुर्योधन येरणे ८ वी या कराटे खेडाळुनी विजयाचे श्रेय कराटे शिक्षक सेंन्साई (मास्टर) गोपाल गोंडाणे, टिस्का इंडिया चिफ सिंहान राजन पिल्ले व कामठी रामाकृष्ण सारदा मिशनचे सचिव अमोघ प्राणा माताजी, प्राचार्य ध्याननिष्ठाप्राणा माताजी हयाना दिले. विजयोत्सव म्हणुन कराटे मास्टर गोपाल गोंडाणे यांंच्या नेतृ त्वात गांधी चौक कन्हान येथुन नाका नं ७ पर्यंत महामार्गाने विजय रैली काढुन नेपाळ कराटे स्पर्धेतील विद्यार्थ्यी खेडाळु चे पुष्पहाराने स्वागत करून अभिनंदना चा वर्षाव करण्यात आला. यात सुजाता बुद्ध विहार व्दारे संजय रंगारी, बाळु नाग देवे, दौलतजी ढोके, दिपंकर गजभिये, नितेश वासनिक, नितीन खोब्रागडे, बंडू रंगारी, धम्मा उके, सचीन बगडते, चंपा गजभिये, मालन ढोके, परिणिती अनकर, बेबीबाई वासनिक, प्रतिमा रंगारी, अर्चना उके आदि ने पुष्पहाराने स्वागत करून बिस्कीट वितरण केले.

समता सैनिक दल शाखा कन्हान
भंन्ते नागदिपंकर थेरो, रंजन स्वामी सर, मनोज गोंडाणे, राजेन्द्र रासेगावकर, विलास मेश्राम, योगेश्वर फुलझेले, दुर्योध न येरणे, संजय रासेगावकर,महेन्द्र वान खेडे, मधुकर कुंभलकर, रत्नदिप गजभि ये, दुर्गा निकोसे सह कन्हानवासी आणि मित्र परिवार यांनी मुलांचा पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले .

कन्हान शहर विकास मंच
आंबेडकर चौक कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच व्दारे १) श्रेया राजेंन्द्र रासेगावकर २) गुंजन गोपाल गोंडाणे, ३) सिध्दार्थ योगेश्वर फुलझले, ४) परि कांतिलाल झाडे, ५) साक्षी संतोष चरडे, ६) आदित्य राकेश गौरखेडे, ७) यशस्वी योगेश चकोले, ८)दुर्योधन येरणे व कराटे मास्टर गोपाल गोंडाणे या सर्वाचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचा लीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, अभिजीत चांदुरकर, हरीओम प्रकाश नारायण, सोनु खोब्रागडे, प्रकाश कुर्वे, सचिन यादव, नितिन मेश्राम, मुकेश गंगराज आदी मंच पदाधिकारी उपस्थित होते.