Published On : Thu, Sep 19th, 2019

माऊंट लिटेरा झी स्कूल संघाला राज्यस्तरीय च्क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे उपविजेतेपद

कामठी :- तालुक्यातील म्हसाळा येथील माऊंट लिटेरा झी स्कूल संघाने राज्यस्तरीय क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले

महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्यावतीने दौंड येथील जिल्हा स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय 19 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

19 वर्षे वयोगटातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कामठी तालुक्यातील मसाला येथील माऊंट लिटेरा झी स्कूल संघाने अंतिम सामन्यापूर्वी चंद्रपूर सांगली संघचा पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला अंतिम सामन्यात नागपूर महानगरपालिका संघाने विजेतेपद पटकाविले तर माउंट लितरा झी स्कुल संघाला उपवीजेतेपद पटकाविले माऊंट लिटेरा झी स्कूल संघाला राज्यस्तरीय क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे उपविजेतेपद मिळाल्याबद्दल संस्थेचे संचालक विलास कार्लेकर ,प्राचार्य सुनीता के यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले तर विजयी संघाला क्रीडा शिक्षक प्रफुल्ल झुंजारे, किरण गजघाटे यांचे मार्गदर्शन लाभले