कामगारांत भीती, कपात सुरू, सर्वत्र विद्युतीकरणाचा फटका
नागपूर : अलिकडे सर्वत्र विद्युतीकरण होत असल्यामुळे उपराजधानीतील वैभव असलेल्या मोतीबाग डीझल लोकोशेडमध्ये बोटावर मोजता येतील एवढ्याच इंजिनची देखभाल दुरूस्ती सुरू आहे. या लोकोशेडमध्ये कधीकाळी हजारो कामगार असायचे आता डिझेल इंजिनचे कामच कमी झाल्यामुळे येथील कामगारांना इतरत्र पाठविण्याचा क्रमही सुरू झाला आहे. पुढे डिझेल इंजिनच उरनार नाही, तर हळुहळू प्रकल्पच हलविला जाईल, अशी शंका रेल्वेशी संबंधित जाणारांकडून व्यक्त होत आहे.
भारतीय रेल्वेत सर्वत्र नॅरोगेज होते. अत्याधुनिकरणाच्या युगात नॅरोगेज एैवजी आता सर्वत्र ब्राडगेज होत आहेत. कधी काळी वाफेवर चालणारे इंजिन होते. नंतर डिझेल आता विद्युतीकरण झाल्याने डिझेल इंजिन मागे पडत आहेत. नागपूर विभागात नॅरोगेज आणि डिझेल इंजिन मोठ्या प्रमाणात असल्याने फार वर्षापूर्वी मोतीबाग डीझेल लोको शेड सुरू झाले. येथे नॅरोगेज इंजिनच्या देखभाल दुरुस्तीची कामे व्हायची. काळाच्या ओघात नॅरोगेज रेल्वे इतिहासजमा झाली. सोबतच सर्वत्र विद्युतीकरण होत असल्याने डिझेल इंजिन मागे पडत आहे, त्यामुळेच मोतीबाग शेडच्या वैभवालासुद्धा उतरती कळा लागली. आता केवळ नागपूर नागभिड हा एकच नॅरोगेज मार्ग शिल्लक आहे.
लोकोशेडमधील काम फारच कमी झाल्याने २०१५-१६ मध्ये कोट्यवधींचा खर्च करून ब्रॉडगेज डब्यांच्या देखभाल दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले. शेडला २५ ब्रॉडगेज डब्यांच्या देखभाल दुरुस्तीची मान्यता असून हळुहळू शेडची क्षमता ४० लोकोपर्यंत नेण्याची ग्वाही देण्यात आली होती. पण, आजही पुरेशा प्रमाणात कामच येत नाही. येथे इलेक्ट्रिक, मॅकेनिक, स्टोअर, व्यवस्थापन हे विभाग आजही असले तरी कामगारांची संख्या केवळ अडीचशेवर आली आहे. आज महिन्याकाठी सरासरी केवळ ११ नॅरोगेज इंजिन आणि १४ ब्रॉडगेजचीच देखभाल दुरुस्ती होत आहे.
यामुळे येथील कर्मचाºयांना इतरत्र हलविले जात आहे. त्याविरोधात कामगारांनी आंदोलनही उभारले होते. तत्कलिन रेल्वेमंत्री मल्लीकार्जून खरगे. त्यांच्यानंतरचे मंत्री व खासदारांनी भेटी देऊन शेड होणार नाही अशी ग्वाही दिली होती, हे विशेष. काम खेचून आणण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा कामगारांचा आरोप आहे. तर दुसरीकडे जागाच अपुरी असल्याने शेडचे विस्तारीकरण अशक्य असल्याचे अधिकाºयांचा दावा दावा आहे.
कामगारांना अपग्रेड
मोतीबाग लोको शेडमध्ये १० ते १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या कामगारांना अपग्रेड करून त्यांची गोंदियाला बदली करण्यात आली आहे. महिनाभरात नवीन जागी रूजू व्हा, अन्यथा अपग्रेडेशन रद्द केले जाईल, असा इशारासुद्धा कर्मचाºयांना देण्यात आला असल्याची माहिती आहे.