Published On : Sun, May 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

“आई म्हणजे संघर्षाची सावली, प्रेरणेचा दीप आणि आयुष्याचा खंबीर आधार” – निधी तेलगोटे

Advertisement

नागपूर शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण करणाऱ्या नगरसेविका यांनी आपल्या आई यांना आपल्या आयुष्याचे सर्वात मोठे प्रेरणास्थान मानले आहे. मदर डेच्या निमित्ताने त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आईच्या संघर्षमय प्रवासाला आणि समाजासाठी केलेल्या कार्याला सलाम केला.

निधी तेलगोटे म्हणतात, “आई ही केवळ जन्म देणारी नसते, तर ती आपल्या प्रत्येक स्वप्नामागची ताकद असते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक यशामागे माझ्या आईचे संस्कार आणि मार्गदर्शन आहे. मी राजकारण, समाजकारण आणि लोकसेवा जवळून पाहिली ती आईमुळेच.”

Gold Rate
June 24 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,600 /-
Gold 22 KT ₹ 1,33,300 /-
Silver/Kg ₹ 2,23,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मीनाक्षी तेलगोटे या व्यवसायाने वकील, सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रभावी राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणून त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग ३६ मधून २०१७ ते २०२२ या काळात नगरसेविका म्हणून काम केले. तसेच विधी समिती सभापती म्हणून त्यांनी मनपामध्ये कायदेशीर आणि प्रशासकीय कामकाजात उल्लेखनीय नेतृत्व केले.

रस्ते विकास, सिमेंट काँक्रीट रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाइट, उद्यान आणि सार्वजनिक सुविधा यांसारख्या मूलभूत विकासकामांमध्ये त्यांनी सातत्याने काम केले. मागील आठ वर्षांत प्रभागात अंदाजे २८ ते ३१ कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करून त्यांनी नागरिकांचा विश्वास जिंकला. महिला सशक्तीकरण, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

Advertisement

आईच्या या कार्याचा प्रभाव निधी तेलगोटे यांच्या व्यक्तिमत्त्वावर स्पष्टपणे दिसून येतो. Law Student आणि Policy Researcher असलेल्या निधी यांनी B.Sc. in Hospitality & Hotel Administration, MBA in Human Resource Management तसेच Leadership, Politics & Governance मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी Rambhau Mhalgi Prabodhini येथे Women in Politics Research Fellowship देखील पूर्ण केली आहे.

सार्वजनिक धोरण, महिला सशक्तीकरण, युवानिर्मिती आणि संविधान जागर या क्षेत्रात त्या सक्रिय असून, “Vivah Bharatam” या युवा-केंद्रित policy proposal वर त्या काम करत आहेत. भारतीय संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि विचारशील नेतृत्व तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या डिजिटल माध्यम आणि लेखनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहेत.

निधी सांगतात, “आईने मला शिकवले की राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही, तर लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रामाणिकपणे काम करणे. लोकांच्या डोळ्यातील विश्वास हेच खरे यश असते.”

मदर डेच्या निमित्ताने आई-मुलीच्या या प्रेरणादायी नात्याची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात होत असून, मीनाक्षी तेलगोटे यांचा संघर्षमय आणि लोकाभिमुख प्रवास अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

– रविकांत कांबळे

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

तुकाराम मुंढेंची बदली करण्यासाठी 250 कोटी जमा, आव्हाडांच्या आरोपाने खळबळ

तुकाराम मुंढेंची बदली करण्यासाठी 250 कोटी जमा, आव्हाडांच्या आरोपाने खळबळ

"Nagpur Gave Me Unforgettable Love ❤️ | Dr. Ravinder Singal"

"Nagpur Gave Me Unforgettable Love ❤️ | Dr. Ravinder Singal"

नागपुर में लिफ्ट मांगकर युवक का अपहरण #nagpurnews #crime #kidnapping #latestnews #maharashtranews

नागपुर में लिफ्ट मांगकर युवक का अपहरण #nagpurnews #crime #kidnapping #latestnews #maharashtranews

मजदूर की मौत पर सड़क पर प्रदर्शन.. #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews

मजदूर की मौत पर सड़क पर प्रदर्शन.. #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews

पानीपुरी विक्रेता पर चाकू से जानलेवा हमला #nagpurnews #Crime #murder #criminal #LatestNews

पानीपुरी विक्रेता पर चाकू से जानलेवा हमला #nagpurnews #Crime #murder #criminal #LatestNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges