Published On : Sat, Apr 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक; महाराष्ट्रात ५०२३ जणांची नोंद, १०७ जण बेपत्ता

Advertisement

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. देशात कोणताही पाकिस्तानी नागरिक अवैधरीत्या राहणार नाही, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपल्यानंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक देशात राहू नये. त्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यात सध्या ५०२३ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी फक्त ५१ जणांकडे वैध कागदपत्रे आढळली आहेत. विशेष म्हणजे १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून, पोलिस किंवा इतर यंत्रणांना त्यांचा पत्ता लागलेला नाही.

नागपूर शहरात सर्वाधिक २४५८ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, तर ठाणे शहरात ११०६ आणि नवी मुंबईत २३९ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक असून, पिंपरी-चिंचवडमध्ये २९० जणांची नोंद आहे.

सध्या राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा या नागरिकांचा तपास घेत आहेत. जे बेपत्ता झाले आहेत, त्यांचा लवकरात लवकर शोध घेणे आणि अवैधरीत्या राहणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल निर्णायक ठरणार आहे, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे.

Advertisement
Advertisement