sucide.jpg
नागपूर : शहरातील रामदासपेठ परिसरातील स्मार्ट बाजार रोडजवळ ५० वर्षीय अज्ञात इसमाला बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, तातडीने या इसमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल हॉस्पिटल) नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वसंत हरिभाऊ घाटोकर (वय ६२, रा. खरेबी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताबर्डी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
मृत इसमाची ओळख व मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.