| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, May 11th, 2020

  कामठी तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी ई-लर्निंग पासून वंचित

  लर्न फॉर्म होम चा फायदा घेणे ठरते अशक्यच

  कामठी :- कोरोना व्हायरस चा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये कधीही न थांबणारा देश, राज्य, जिल्हा व तालुका थांबल्याने नाईलाजाने तेथिल शाळा महाविद्यालये बंद आहेत याच पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यातील शाळा महाविद्यालये सुद्धा बंद आहेत जून महिन्यापर्यंत तरी ह्या शाळा ,महाविद्यालये सुरू होणार नाहींत, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत तेव्हा मुलांचे शैक्षणिक वर्ष लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वतिने लर्न फॉर्म होम ची संकल्पना राबविण्यात आली यामध्ये विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासुन दूर जाऊ नये यासाठी शासनाच्या शैक्षणिक वीभागाने घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षण कक्षातील विविध संकेतस्थळे पोर्टल अप्लिकेशन घायची ही योजना असून विद्यार्थ्यासाठी ई लर्निंग ची सुविधा करण्यात आली मात्र तालुक्यातील बहुतांश शाळेत मोठ्या प्रमाणात गोरगरिब मजुरांची मुले आहेत .

  लॉकडाउन मध्ये एक वेळच्या जेवणाची सोय नाही अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांना अँड्रॉइड सारख्या मोबाईल मधून ई लर्निंग च्या माध्यमातून मुलांना घरून अभ्यास करने हे एक आव्हानात्मक असल्याने हे गरीब विद्यार्थी नाईलाजाने ई-लर्निंग पासून वंचितच राहले आहेत त्यामुळे लर्न फार्म होम चा फायदा घेणे ह्या गरीब विद्यार्थ्यांसाठी अशक्यच ठरत असल्याने ह्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग त्यांच्यासाठी दिवास्वप्न च ठरत आहे.

  आजच्या स्थितीत अजूनही बहुतांश कुटुंबाकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आणि असला तरी त्याच्याकडे नेटपॅक घेण्यासारखी स्थिती नाही.सध्याची लॉकडाउन च्या स्थितीत हाताला काम नाही , खायला अन्न नाही अशी अवस्था सध्या अनेक कुटुंबियांची आहे अशा काळात शासनाची लर्न फॉर्म होम ची संकल्पना गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी ठरत आहे अजूनही कित्येक विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे नाईलाजाने गरीब कुटुंबातील या विद्यार्थ्यांला ई लर्निंग पासून वंचित राहावे लागेल परिणामी हा विद्यार्थी या लॉकडाउन च्या काळात शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याच्या स्थितीत आहे त्यातही संबंधीत शाळेकडून सुरू करण्यात आलेल्या

  या ई लर्निंग मध्ये कोणते विद्यार्थी सहभागी नाहीत याचा पाठपुरावा सुद्धा घेण्यात येत नसून शाळेतर्फे घेण्यात येणारा लर्न फॉर्म होम ही संकल्पना हवेतच सुरू असल्याचे दिसून येते परिणामी अँड्रॉइड मोबाईल हाताळणाऱ्या श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थी तुपाशी आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थी उपाशी असल्याची स्थिती निर्माण झाल्याने ई लर्निंग पासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जवाबदार कोण?असा ही प्रश्न इथे उभा होऊन ठाकला आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145