| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jul 28th, 2017

  स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत अधिकाधिक प्रसाधनगृहे देणार – आयुक्त अश्विन मुदगल


  नागपूर:
  नागपूर महानगरपालिका व रोटरी कल्ब यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरातील जपानी गार्डन येथेप्रसाधनगृहाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आले.

  याप्रसंगी नगरसेविका शिल्पा धोटे, नगरसेविका प्रगती पाटील, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त जयंतदांडेगावकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, कार्यकारीअभियंता डी.डी.जांभूळकर, रोटरीचे अध्यक्ष प्रमोद जवांगिया, सचिव पियुष फत्तेपुरिया प्रामुख्याने उपस्थित होते.

  नागपूर शहरात ५० सार्वजनिक प्रसाधनगृह तयार करण्याचे महानगरपालिकेने ठरविलेले आहे. नागपूर शहर स्मार्ट सिटीच्यादृष्टीने अग्रेसर होत आहे. स्वच्छ भारत या मोहिमेअंतर्गत शहर स्वच्छ राहावे याकरिता काही जागी स्वच्छतागृह प्रसाधन गृहतयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. या सर्व स्वच्छतागृह व प्रसाधनगृहाचीदेखभाल महापालिकेद्वारे नेमणूक करण्यात आलेल्या एजेंसीला देण्यात येणार आहे.


  शहरात तयार केलेले प्रसाधनगृह हेगुगल मॅप वर दिसणार असून त्याद्वारे या प्रसाधनगृहाचा शोध नागरिकांना घेता येणार आहे. या प्रसाधनगृहांना फिडबॅकचीसोयही करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रतिष्ठीत संस्थांनी व संघटनांनीपुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी मुदगल यांनी केले.

  कार्यक्रमाला धरमपेठ झोनचे डी.पी.टेंबेकर, रोटरी कल्बचे माजी अध्यक्ष विजयश्री खानोरकर, संजय मोहता, रवी अग्रवाल,नरेश जैन उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145