नागपूर : नागपूर शहर वाहतूक विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहिमेअंतर्गत अवघ्या १८ दिवसांत तब्बल ६३६ कारवाईची नोंद झाली असून, ही संख्या जानेवारी २०२५ पासून २८ जुलैपर्यंत झालेल्या एकूण १३२४ कारवायांपैकी अर्ध्याहून अधिक आहे.
ही मोहिम १० जुलै ते २८ जुलै २०२५ दरम्यान राबविण्यात आली आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या नियमभंगावर कारवाई करण्यात आली.
वाहतूक परिमंडळांनुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:
इंदोरा : सर्वाधिक ९४ कारवाई
कामठी : ८६
सोनेगाव : ७८
एमआयडीसी : ७७
सदर : ६५
कॉटन मार्केट : ६०
लकडगंज : ५९
अजनी : ५६
सिताबर्डी : ३५
सक्करदरा : २६
महत्त्वाचे म्हणजे, या मोहिमेदरम्यान केलेल्या कारवायांची संख्या ही जानेवारीपासूनच्या ७ महिन्यांतील कारवाईच्या तुलनेत ४८% पेक्षा जास्त आहे, जे शहर वाहतूक पोलिसांच्या आक्रमक आणि काटेकोर अंमलबजावणीचे द्योतक मानले जात आहे.
वाहतुकीतील अराजकता रोखण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहिम राबवण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कडक कारवाई आगामी काळातही सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
‘ऑपरेशन यू-टर्न’मुळे शहरातील वाहतूक शिस्तबद्ध होण्याची शक्यता वाढली असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.