कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील मोरबी टाईल्स मध्ये मागील 20 वर्षांपासून मजूर स्वरूपात काम करीत असलेल्या मजुराच्या अंगावर कडप्पे पडल्याने त्या कडप्प्यातच दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 1 दरम्यान घडली असून मृतक मजुराचे नाव प्रदीप रामदास चौरे वय 40 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार मृतक प्रदीप चौरे व त्याचे वडील रामदास चौरे हे मागील 20 वर्षापासून रणाळा कामठी येथील मोरबी टाईल्स मध्ये कार्यरत आहे.दैनंदीन रित्या आज दुपारी मोरबी टाईल्स मध्ये टाईल्स चे जवळपास सहा कडप्पे इतर मजुरांच्या साहाय्याने उचल करोत असता अचानक तोल न संभाळल्याने इतर मजुरांनी जीव वाचवून बाजूला सारले मात्र सदर मृतक च्या अंगावर सर्व कडप्पे पडल्याने त्या कडप्प्यातच दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
ही घटना घडल्याची माहिती स्थानिक नवीन कामठी पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी आसटकर, मनोज चौधरी, धोटे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
संदीप कांबळे कामठी









