Published On : Mon, Jul 13th, 2015

चंद्रपुर (मूल) : मदभागवत सप्ताहात भक्तजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Madbhagawat week
मूल (चंद्रपुर)। जून महिन्या पासून सुरु झालेल्या अधिक मासात मुल येथे वार्ड नं. 14 येथील संत गजानन महाराज परिसरातील तालुका क्रिडा स्टेडीयमच्या आवारात मदभागवत कथा प्रेम यज्ञ समारंभ सुरु आहे. अयोध्या धाम येथील भागवत कथाचार्य आंतरराष्ट्रीय बाल संत अंकितानंदजी महाराज यांच्या मधुर वाणी ने भगवान श्रीकृष्ण-राधा यांच्या कथासार भक्तजनांच्या अंतकरणात अंतर्भावीत होत असल्याने उपस्थित भक्तजन कथा श्रवण करण्यास मंत्रमुग्ध झाले आहेत.

3 जुलै 2015 पासून सुरु झालेल्या मदभागवत कथा श्रवणाची वेळ सकाळी 8 ते 11 पर्यंत आणि रात्री 7 ते 10 वाजे पर्यंत ठेवण्यात आले आहे. भगवान श्री कृष्णाची संपूर्ण लीला भक्त जणांना ऐकवली जात आहे. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष श्री कृष्णाचा जन्म, विवाह, सोबतच कृष्ण लीलेचे उपक्रम सुद्धा प्रत्यक्ष बाल-गोपालान कडून घेऊन भक्त जणांचे लक्ष वेधले जात आहे. भागवत कथेच्या संगीतमय भक्ती रसात उपस्थित महिला-पुरुष-बालक-बालिका तल्लीन होत आहेत.

मदभागवत कथा सप्ताह मुल येथे आयोजन करण्यास बाबुभाई पटेल, नगर सेवक प्रभाकर भोयर, बाजार समिती सभापती राजेश रत्नावार, बाळू सूरमवार, प्रा. दिलीप जगनाडे, सत्यनारायण गोयल, नरेश गोयल, सुरेंद्र अग्रवाल यांचा सोबत वार्डातील नागरिक आपल्या धर्म पत्नीसह तन-मन-धना ने सहकार्य करीत आहेत. सुरु असलेल्या मदभागवत कथेचा समारोप 14 जुलै रोजी यज्ञ कुंडाने व महाप्रसादाने होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement