Published On : Mon, Jun 4th, 2018

येत्या 48 तासांत महाराष्ट्रात मान्सून

Monsoon, Rain in Kerala

Representational pic

मुंबई : तमाम महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहात आहे तो मान्सून पुढच्या ४८ तासांत गोव्यासह कोकणात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. कुलाबा वेध शाळेने हा अंदाज वर्तवला आहे. तो सध्या महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत येऊन थांबला आहे. सध्या मान्सून गोव्याजवळ पोहोचला आहे. पण महाराष्ट्रात प्रवेश करायला तो आणखी दोन दिवस घेणार आहे.

पुढच्या ३६ तासांत राज्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. परंतु कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावेल. त्यामुळे बळीराजाने आपल्या पिकांची काळजी घ्यावी. रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपीट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.