
केरळ – केरळमध्ये अखेर दक्षिण-पश्चिम मान्सूनचे आगमन झाले असून देशभरात पावसाची चाहूल लागली आहे. काही दिवसांच्या विलंबानंतर मॉन्सून केरळमध्ये पोहोचल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही मान्सूनची प्रगती दिसून येईल.
दरम्यान, विदर्भात मात्र मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 15 जूननंतरच विदर्भात पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मात्र या भागात उष्णतेची तीव्रता कायम असून तापमान 40 ते 42 अंश सेल्सियसदरम्यान नोंदवले जात आहे.
पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हा पाऊस मान्सूनपूर्व स्वरूपाचा असून, अजून विदर्भात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण पूर्णपणे तयार झालेले नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर अधिक राहू शकतो. काही भागांत तुरळक पावसाची शक्यता असून पुढील 24 तास हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशपासून विदर्भ, तेलंगणा आणि रायलसीमा पर्यंत उंचावरील सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि झंझावात निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून विदर्भातील बहुतांश शहरांमध्ये तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया आणि वर्धा येथेही तापमान 41 ते 42 अंशांपर्यंत पोहोचले आहे.
एकीकडे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने दिलासा मिळाला असला तरी विदर्भातील नागरिकांना पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
गोवंश तस्करी गिरोह पर पहली बार मकोका ...#crime #latestnews #nagpurnews #vidarbha #maharashtra
रोहित पवार को कर्जमाफी का अध्ययन नहीं: परिणय फुके #nagpurnews #rohitpawar #PoliticalNews
विलय हो तो शरद पवार बनें अध्यक्ष: गजभिये #nagpurnews #MaharashtraNews #politicsnews
कांग्रेस में विलय की अटकलें पूरी तरह खारिज ...#news #latestnews #maharashtranews #vidarbha...







