Published On : Sat, Jun 5th, 2021

मोहफुल गावठी दारु सामग्री साहित्य जप्त

– दुधाळा रोडवरिल नगरपरिषद रामटेकच्या कॉर्ट्रस (घरकुल) संकुलातिल 60 नं च्या कॉर्टर मध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा

रामटेक – पो स्टे रामटेक हद्दीत प्रोव्हिजन रेड कामी पोलिस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांचे आदेशाने रवाना असता कवडक दुधाळा रोडवरिल नगरपरिषद रामटेक च्या कॉर्ट्रस (घरकुल) संकुलातिल 60 नं च्या कॉर्टर मध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा करुन त्याची विक्री होत

असले बाबत गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे,पो.उपनि रावुत,पोशि शिरसाठ , पोशि सोबत होमगार्ड स्टाफ़ असे सदर ठिकाणी जावुन दारू रेड कार्यवाही केली असता 8 मोठ्या रबरी ट्यूब मध्ये प्रत्येकी 50 लिटर दारु प्रमाणे 400 लिटर दारु,6 प्लास्टिक ड्रममध्ये 50 लिटर प्रमाणे 300 लिटर दारू व एका प्लास्टिक ड्रम मधे 100 लिटर दारू अशी एकुण 800 लिटर मोहफुल गावठी दारु ज्याची एकुण किंमत 1,60,000/-रुपये व सोबत 5000 रुपयाचे इतर दारूकरिता आवश्यक सामग्री साहित्य असा एकुण 1,65,000/- रु.किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन यातील आरोपि विजय आहिरकर रा.शिवाजी वॉर्ड,रामटेक याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.