पेण : भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नही होगा, मोदी गॅरंटी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पेणच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ईडी, सीबीआयवरून भाजपला धारेवर धरले. भ्रष्टाचार करा, भाजपात या, तुम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद मिळेल. आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच आणि क्लीनचीट देणारेही हेच, असा घणाघात ठाकरेंनी केला.
ही मोदी गॅरंटी, ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे का? जे हुकुमशाहीविरोधात राहतील त्यांना तुरुंगात टाकले जात आहे.
भाजपा-आरएसएस कार्यकर्त्यांनी डोळे उघडावे. ही लढाई भाजपाविरोधात इतर पक्ष नाही तर ही लढाई हुकुमशाहीविरुद्ध लोकशाही अशी आहे. तुम्ही ज्यांच्या सतरंज्या घालताय, ज्यांच्यामागे उठाबशा काढत आहेत.
त्यांच्या हातात देश देताय याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या हुकुमशाहीच्या हातात देत असल्यासारखेच चित्र आहे. हे पाहता तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. .