Published On : Tue, Sep 3rd, 2019

अग्निशमन विभागाची केअर हॉस्पीटल येथे मॉक ड्रिल

नागपूर: आपात्कालिन परिस्थितीत हॉस्पीटल मधील कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे व त्यांना अशा परिस्थितीत योग्यरित्या तोंड देता यावे यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागा मार्फत केअर हॉस्पीटल येथे मंगळवार (ता.3) फायर ईव्हॅकेशन ड्रीलचे आयोजन करण्यात आले.

आपातकालिन परिस्थितीत हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी व काय करावे, रूग्णांची कशी मदत करावी कसे बाहेर पडावे याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. या मॉक ड्रीलदरम्यान रूग्णांचा नातेवाईकांचा भऱपूर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. अशा प्रात्याक्षिक कवायतींचे आयोजन इतर हॉस्पीटलमध्ये व्हावे, अशी इच्छा रूग्णांच्या नातेवाईकांनी यावेळी व्यक्त केली.

ही मॉक ड्रील प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली. यावेळी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सहा स्थानानिधाकारी केशव कोठे, सुनील राऊत यांनी मॉक ड्रीलच्या कवायतींचे आयोजन केले होते.

अग्निशमन विमोचक तुषार नेवारे, गोपाल तायडे, निखिल भालेराव यांनी प्रात्याक्षिक साजरे केले. यावेळी केअर हॉस्पीटलचे संचालक वरूण भार्गव, रविकुमार मनाडिया, प्रशासकीय अधिकारी सतीश टाटा, लायसन्स ऑफिसर दीपक बॅनर्जी, डिझायस्टर मॅनेजर व हॉस्पीटलचे कर्मचारी व अधिकारी यांच्यासह रूग्ण व त्यांचे नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते.