Published On : Wed, Sep 9th, 2020

मनसेच्या सांस्कृतिक संपर्कप्रमुखाचा आणि नंदुरबारमधील भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत केला जाहीर प्रवेश

मुंबई : मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्कप्रमुख डॉ. ओमकार हरी माळी आणि उद्योजक पंकज सिन्हा यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तर नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील उपस्थित होते.

Advertisement
Advertisement