Published On : Thu, Jan 23rd, 2020

मनसेने भगवा झेंडा वापरल्याने भाजपाच्या पोटात धस्स झालंय – जयंत पाटील

Advertisement

मुंबई : भाजप हिंदूंची मत वापरण्याची वोटबॅंक होती आणि आता मनसेने भगवा झेंडा वापरला असल्याने भाजपाच्या पोटात धस्स व्हायला लागले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

पत्रकारांनी मनसेचा भगवा आणि भाजपाचे हिंदुत्व यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजपाच्या बेगडी हिंदुत्वावर जोरदार टीका केली.

Advertisement
Advertisement

भाजप शरद पवारसाहेबांना घाबरतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. मनसेसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली मात्र आता पवारसाहेबांवर आरोप करणं योग्य नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

हिंदुत्वाची मतं फुटू नये एवढंच काम भाजप करतो की, देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजांचेही काम करतो असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

धार्मिकदृष्टया भाजप किती विचार करतो हे हिंदूनाही आता कळून आले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement