Published On : Tue, Dec 14th, 2021
By Nagpur Today Nagpur News

MLC election result : नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विजयी

भाजपने गड राखला, काँग्रेसची खेळी फसली

नागपूर: नागपूर विधान परिषद निवडणुकीत (Nagpur MLC election result) नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. तर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे, या विजयाची आता केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा तब्बल 176 मतांनी विजय झाला आहे. काँग्रेसने मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार बदलल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला असल्याचं बोललं जात आहे.

कुठल्या उमेदवाराला किती मते?

चंद्रशेखर बावनकुळे 362

मंगेश देशमुख 186

छोटू भोयर 1

अवैध 5

Advertisement
Advertisement