Published On : Wed, Dec 18th, 2019

नागपूर येथील आमदार निवासात मद्यपी धुमाकूळ घालतात; तर महिला आमदार असुरक्षित आहेत ! – भाजपचे आमदार सचिन आणि आमदार मंदा म्हात्रे

नागपूर: येथील आमदार निवासात रात्री मद्यधूंद अवस्थेत काही मद्यपींनी १७ डिसेंबरला रात्री २.३० वाजता आपल्याशी हुज्जत घालून मद्यासाठी ५०० रुपयांची पैशाची मागणी केल्याचे सूत्र अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कलशेट्टी यांनी १८ डिसेंबरला विधानसभेत उपस्थित केल्यावर सभागृहात सर्वांना धक्का बसला.

मद्यपींनी पैसै न दिल्यास बघून घेऊ अशी धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितले, तर भाजपच्या ज्येष्ठ सदस्या मंदा म्हात्रे यांनी आमदार निवासात महिला आमदारांना असुरक्षित वाटते. मद्यपी धूमाकूळ घालतात या गोष्टीकडे लक्ष वेधून सुरक्षितता देण्याची मागणी केली.

Advertisement

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व सदस्यांना सुरक्षितता असली पाहिजे असे सांगून आपण स्वतः याची नोंद घेतली आहे, असे सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव येथे वाळू माफियांनी तहसीलदारावर ट्रॅक्टर घालून त्यांना गंभीर घायाळ केले आहे.

Advertisement

त्यामुळे या प्रकरणातील गुन्हेगारांना मोका लावावा, घायाळ तहसीलदाराच्या उपचाराचा सर्व व्यय शासनाने करावा, अशी मागणी केली. शासनाने निवेदन करावे, असे निर्देश या संदर्भात अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य भारत भालके यांनी कार्तिकी एकादशीस संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज महाराज यांसह वारकर्‍यांना दिवेघाटात अपघाती मरण आले होते.

त्यांना घोषित केलेली हानीभरपाई मिळावी अशी मागणी केली. त्यावर माजी महसूलमंत्री आणि भाजपचे सदस्य चंद्रकांत पाटील याांनी आपण ते साहाय्य पक्षाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य दिले आहे, असे स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement