| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, May 13th, 2021

  कोहिनूर लॉन येथील लसीकरण केंद्राला आमदार कृष्णा खोपडे यांची भेट

  नागपूर : नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग२६ मधील कोहिनूर लॉन मध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला गुरुवारी (ता.१३) पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी भेट दिली.

  सर्व नागरिकांचे लसीकरण सुरळीत व्हावे व त्यांना त्यांच्या परिसरात लसीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रभाग २६ मध्ये कोहिनूर लॉन येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकाराने या केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे.

  आमदार कृष्णा खोपडे यांच्या भेटीदरम्यान प्रमोद पेंडके, संजय अवचट, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे, कमलेश नागपाल, डॉ. अनुश्री कांबळे, प्रिया बेलदार, राजेश संगेवार, सुरेश बारई आदी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145