नागपूर: एकीकडे ऊस उत्पादक शेतकरी मरतो आहे. सहकारी साखर कारखाने अस्तित्वाची लढाई लढत आहेत. एफआरफीवरुन मोठमोठया बैठका घेतल्या जात आहेत आणि हे सर्व घडत असताना आपले तोंड मात्र पाकिस्तानच्या साखरेने गोड करावे यासाठी केंद्र सरकारने पाकिस्तानमधून १५ लाख मेट्रीक टन साखर आयात केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी केला.
एकीकडे पाकिस्तानच्या नावाने शिमगा करत निवडणूका जिंकायच्या आणि दुसरीकडे कांदा उत्पादकांना मारण्यासाठी पाकिस्तानातून कांदा आयात करायचा.ऊस उत्पादकांना मारण्यासाठी साखर आणायची हा विरोधाभास आहे. मी जेव्हा साखर वाटत होतो त्यावेळी पाकिस्तानची साखर सांगितली त्यावेळी लोकांनी हातात घ्यायला नकार दिला.
उदया तुमच्या सर्वांच्या घरामध्ये पाकिस्तानमधील साखर येणार आहे ती गोड लागेल की ती कडू लागेल याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले.