Published On : Wed, Nov 29th, 2023

आमदार अपात्रतेचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत जाहीर करणे कठीण; राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून मागणार ?

Advertisement

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. मात्र,महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे मुदत वाढवून द्या, अशी विनंती नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात मदार अपात्रता प्रकरणाची नियमित सुनावणी होत असताना दुसरीकडे विधिमंडळाचे कामकाज असणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी मुदतीत सुनावणी घेऊन निर्णय घेणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व करताना राहुल नार्वेकर यांच्या कामात वाढ होणार आहे.

विधिमंडळाचे दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी घेतली जाऊ शकते, असा अंदाज आहे. हे पाहता विधानसभा अध्यक्षांकडून सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून मागण्याची विनंती केली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान सातत्याने ठाकरे गटाकडून आमदार अपात्रता प्रकरणात दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.