Published On : Sun, Sep 8th, 2019

निष्णात कायदेपंडित गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

Advertisement

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनाने आपण देशातील एक निष्णात कायदेपंडित गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. जेठमलानी यांची विधी, समाजकारण आणि राजकारणातील कारकिर्द वैशिष्ट्यपूर्ण होती. फौजदारी कायद्यासोबतच दिवाणी कायद्यावरही त्यांचा अधिकार मोठा होता. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तबगारीने एक मानदंड निर्माण केला होता.

Gold Rate
13 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,31,800 /-
Gold 22 KT ₹ 1,22,600 /-
Silver/Kg ₹ 1,88,800/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांनी लढवलेले काही प्रसिद्ध खटले मैलाचा दगड ठरले आहेत. बार असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचे त्यांनी नेतृत्व केले होते. अटलजींच्या मंत्रिमंडळात त्यांनी विधी व न्याय तसेच नगरविकास विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. विशेषत: आणीबाणीविरुद्ध त्यांनी दिलेला लढा कायम स्मरणात राहील.

Advertisement
Advertisement