Published On : Thu, Jul 18th, 2019

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी आरोपीस अटक

नागपूर: घरी कुणी नसल्याची संधी साधून अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना दि.१४ जुलै (रविवार)ला सकाळी १० ते ११ च्या दरम्यान बुटीबोरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

तनवीर मुस्ताक शेख (२०) रा.वार्ड क्र.३ नवीन वसाहत बुटीबोरी असे अल्पवयीन मुलीचा छळ करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार घटना असी की, पीडिता (वय ११) ही आरोपीच्या राहत्या घरी वरच्या माड्यावर गेले सहा महिन्यांपासून आपल्या आजी आजोबा सोबत किरायाने राहत होती.तिच्या मोठ्या वडिलाचा अपघात झाला असल्याने तिचे आजी आजोबा हे त्यांच्या भेटीला गेले होते.पीडिता ही घरी एकटीच होती.घरी कुणी नसल्याची संधी साधून आरोपी गाडी दुरुस्त करायची आहे म्हणून पाना मागण्याचा बहाणा करून पीडितेच्या खोलीत गेला आणि तिचा लैंगिक छळ केला.पीडितेने आरडा ओरड केल्याने आरोपीने तिथून पळ काढला.फिर्यादी पीडितेच्या आईने सदर घटनेची माहिती बुटीबोरी पोलीस स्टेशन ला दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र चौहान यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीस त्याच्या घरून अटक करून त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत तथा पोस्को अन्वये विविध कलमा नुसार तीन दिवशीय पोलीस कोठडी ठोठावली असून पुढील तपास राजेंद्र चौहान करीत आहेत.