Published On : Thu, May 14th, 2020

सांगली जिल्हयातून २ कोटी ५२ लाखांचे धनादेश मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे आज केले सुपुर्द

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मंत्री जयंत पाटलांचे मानले आभार…

मुंबई : -राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज सांगलीतून २ कोटी ५२ लाख २६ हजार ३९४ रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.

या मदतीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने २ कोटी २५ लाख रुपये, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना यांच्यावतीने १२ लाख ७६ हजार ३९४ रुपये, राजारामबापू सहकारी बँकेच्यावतीने १४ लाख ५० हजार रुपये आदी धनादेशांचा समावेश आहे.

सांगली जिल्हयातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचे धनादेश दिल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री. जयंत पाटील व मदत दिलेल्या संस्थाचे आभार मानले आहेत.