Published On : Thu, May 14th, 2020

शिवभोजन थाळी सेंटर चे काटोल मध्ये उद्घाटन

काटोल : महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाद्वारे गरीब व गरजू लोकांसाठी शिवभोजन धाली चे काटोल मधील मधुसूदन हॉटेल, स्टेट बँकेच्या बाजूला, तार बाजार काटोल येथे आजपासून सुरवात झाली असून शिवभोजन धाली केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदचे सदस्य शेखर कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिपक मोहिते याच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषदचे सदस्य समीर उमप, माजी उपसभापती अनुप खराडे, शहर अध्यक्ष गणेश चन्ने, गिरीश पालिवाल, अयुब पठाण, गणेश सावरकर, अमित काकडे, मुन्ना पटेल, शंकर बोरघाटे, प्रेमदास देशभ्रतार, विपुल देवपूजारी, तिलक शीरसागर, पंकज मानकर, भाऊराव घारड, दिलीप घारड, मधुकर घारड, पप्पू पटेल आदी उपस्थित होते.

या शिवभोजन केंद्र दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून या शिवभोजन थली मध्ये दोन पोळी, एक भाजी, एक वाटी वरण व भात असणार आहे. यावे सोशल डिस्टन सिंगचे पालन करण्यात आले असून मोजक्यााच लोकांच्या उपस्थित केंद्राचे उद्घाटन करून लोकांनच्या सेवेत हे केंद्र आजपासून सुरू झाले आहे.