नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दरवर्षी 14 एप्रिल रोजी जंयती सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे मोठ्या उत्सावाची पर्वणीच असते. नागपुरात ठिकठिकाणी आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होत आहे.
डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता. त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. डॉ. आंबेडकर यांना अनेकोवर्षे संघर्ष करावा लागला.
जन्म नवक्रांतीचा-
डॉ. आंबेडकरांचा जन्म केवळ एका माणसाचा नव्हता, तर तो होता नवचैतन्याचा, नवजागरणाचा. त्यांनी शिक्षणाच्या बळावर आत्मसन्मान मिळवला आणि लाखो-कोट्यवधी लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला.
संविधानाचे शिल्पकार-
भारताच्या संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचा मोलाचा वाटा आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची पायाभरणी त्यांनी केली.
शिक्षणाचा मंत्र-
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा त्यांचा मंत्र आजही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात उजाळा देतो. त्यांनी केवळ पुस्तकी शिक्षणच नव्हे तर सामाजिक शिक्षणालाही महत्त्व दिलं.
जातीविरहित समाजाची स्वप्नपूर्ती-
त्यांनी जन्मभर जात-पात, अस्पृश्यता आणि विषमतेविरुद्ध लढा दिला. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून मानवी मूल्यांचा नवा अध्याय उघडला.
तरुणाईसाठी प्रेरणास्त्रोत-
बाबासाहेबांचे विचार आजही तरुणांना मार्गदर्शन करतात. त्यांची जीवनगाथा ही चिकाटी, अभ्यास, संघर्ष आणि आत्मसन्मानाची अमर प्रेरणा आहे.
खरी अभिवादन काय?
फूलं वाहणं, फोटो लावणं ही केवळ रिती आहेत. खरी आदरांजली म्हणजे त्यांच्या विचारानुसार चालणं, सामाजिक समतेसाठी उभं राहणं, आणि वंचितांचं दुःख आपले मानने आहे.आज १३४ वर्षांनंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव जिथे उच्चारलं जातं, तिथं फक्त एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण विचारप्रवाह उभा राहतो. त्यांच्या स्मृतीस आज कोटी कोटी प्रणाम!