Published On : Sat, May 4th, 2024

नागपुरात भूकंपाचे सौम्य धक्के; 2.5 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद

Advertisement

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात 3 एप्रिलला दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. महिनाभराच्या अंतरात नागपुरात बसलेला हा सलग दुसरा भूकंपाचा धक्का असल्याचे समोर आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी या धक्क्यांची नोंद झाली.

नागपूर परिसरात 2.5 रिश्टर स्केल भूकंपाचे तीव्रता नोंदविण्यात आली. मात्र, भूकंपाची 2.5 रिश्टर स्केल श्रेणी भीतीदायक नसल्याचेही सांगण्यात आले. काल दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी या धक्क्यांची नोंद झालीय.

नागपूर परिसरात 2. 5 रिश्टर स्केल भूकंपाचे तीव्रता नोंदविण्यात आली. मात्र, भूकंपाची 2.5 रिश्टर स्केल श्रेणी भीतीदायक नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान 27 मार्च रोजी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नागपूर जिल्ह्यात तीन लहान भूकंपाची नोंद केली होती. त्यावेळी हिंगणा येथील झिलपी तलावाजवळ दुपारी 2.53 वाजता 2.8 तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास कांद्रीजवळील परसोनी येथील खेडी गावातही सौम्य धक्क्यांची नोंद झाली होती.