Published On : Tue, Sep 3rd, 2019

मिहान : खापरी प्रकल्पग्रस्तांशेजारी म्हाडा भूखंडधारकांचे पुनर्वसन होणार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक

C Bawankule

नागपूर: मिहान प्रकल्पात म्हाडाचे एक लेआऊट आहे. या ठिकाणी म्हाडाने अनेकांना भूखंड दिले होते. पण ही जागा मिहानमध्ये गेल्याने या जागेवर ज्यांनी घरे बांधली त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. या जागेवरील नागरिकांचे पुनर्वसन खापरी प्रकल्पग्रस्तांच्या शेजारीच करण्याचा निर्णय आज गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत झाला. या बैठकीला ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

मिहान प्रकल्पांत असलेल्या म्हाडाच्या या जागेवर ज्यांना भूखंड मिळाले, त्यांना भूखंडांचे पैसे दिले जाणार आहेत, तर ज्यांनी तेथे घरे बांधली, त्या नागरिकांना 1000 चौ. फुटाचा भूखंड व घरासाठी पैसे देण्यात आहे. मिहानतर्फे या नागरिकांनी पुनवर्सन करण्यात येणार असल्याचे आजच्या बैठकीत ठरले. ही जागा म्हाडाने मिहान प्रकल्पासाठी हस्तांतरित केली आहे. पुनर्वसन संयुक्तरीत्या करण्यात येणार आहे.

यापूर्वी खापरी येथे पालकमंत्री बावनकुळे यांनी आयोजित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीतही ही जागा म्हाडा मिहानला हस्तांतरित करण्यास तयार असल्याची भूमिका म्हाडाने घेतली होती. त्यानुसार ही जागा मिहानला हस्तांतरित करण्यात आली आहे.

या बैठकीला एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, म्हाडाचे अप्पर मुख्य सचिव संजयकुमार, अति. जिल्हाधिाकारी प्रकाश पाटील व अन्य उपस्थित होते.