Published On : Tue, Feb 18th, 2020

मिहान मधील कंपन्यांकरिता खापरी मेट्रो स्टेशनवरून फिडर सेवेला सुरवात

डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केले फिडर सेवेचे शुभारंभ

नागपूर– शहरातील सर्वच भागातील रहिवाश्यांना मेट्रो प्रवासाचा लाभ मिळावा या धोरणांतर्गत, महा मेट्रोने आज खापरी मिहान स्टेशन येथून विविध स्तरातील फिडर सेवेचा शुभारंभ केला. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी फित कापून या सेवेची रीतसर आज सुरवात केली. नागपूरच्या मिहान भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकरता हि सेवा सुरु केली असू, या मुळे संबंधित कर्मचार्यांना कंपनी ते मेट्रो स्टेशन दरम्यानचा प्रवास अधिकच सुखकर होणार आहे. मिहान मधील विविध कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा भिन्न असतात. विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांपेक्षा भिन्न असतात. त्यामुळे त्या या कर्मचाऱ्यांना घर ते मेट्रो स्टेशन, मेट्रो स्टेशन ते कार्यस्थळ आणि परतीच्या प्रवासाकरिता देखील योग्य ती सोया असणे अतिशय आवश्यक होते. म्हणूनच या सर्व बाबींचा विचार करून महा मेट्रो व्यापक अशी फिडर किंवा मल्टी मॉडल ईंटिग्रेशनची संकल्पना राबवत आहे.

कायनेटिक ग्रीन, केएचएस असोसिएट्स, पाटणी ऑटोमोबाईल, राईड इ, बाउंस, भारत विकास परिषद या कंपनीच्या माध्यमाने इ-ऑटो रिक्षा, इ-स्कुटर, इ-रिक्षा, इ-बायसिकल, एलपीजी ऑटो, एलपीजी-रिक्षासारखया वाहनांच्या सेवेला सुरवात केली. महा मेट्रोने तत्वतः फिडर सेवेच्या सुरवातीसंबंधी १६ विविध सामंजस्य करार करण्याची तयारी केली आहे. या आधी खापरी मेट्रो स्टेशन येथून इ-सायकल आणि बसच्या माध्यमाने फिडर सर्व्हिस सुरु होती.

आता नव्याने ही सर्व्हिस सुरु केल्याने येथील कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही वर्षात मिहान परिसरात अनेक कंपन्यांनी आपले उद्योग थाटले आहेत. मिहानमध्ये, आजच्या घटकेला विविध कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १०,००० पेक्षा जास्त असून या माध्यमाने अप्रत्यक्ष रोजगार मिळणाऱ्यांची संख्या ३०,००० पेक्षा जास्त आहे. मिहान मधील एचसीएल, टीसीएस, इन्फोसेप्ट, टाल, एमआरओ सारख्या प्रमुख कंपन्यांनी हि फिडर सेवा सुरु करण्याची उत्सुकता दर्शवली आहे. आज उद्घाटित झालेली हि सेवा टप्प्या-टप्प्याने सुरु होणार आहे.

या शिवाय लुपिन, हेग्झावेयर, ग्लोबल लॉजिक, एफएससी सारख्या कंपन्या आणि मोराज सारख्या निवासी संकुलातील रहिवासी देखील या सेवेचा लाभ घेण्याचा उत्सुक आहेत. अश्या प्रकारची सेवा सुरु करण्याची मागणी मिहान मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. या माध्यमाने येथील कर्मचारी वर्गाकरिता ही सोय अतिशय लाभदायक ठरेल ही आशा आहे.