Published On : Fri, Aug 16th, 2019

मिहान : खापरी भूसंपादन व पुनवर्सन गावठाण भूसंपादन आणि पुनवर्सन

Advertisement

दोन महिन्यात मिळणार पैसे पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय

नागपूर: मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनवर्सन करण्यात दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, अशी माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिली.

या बैठकीला रवींद्र कुंभारे, प्रकाश पाटील, अविनाश कातडे, एमएडीसीचे चहांदे व शेकडो गावकरी उपस्थित होते. गावठाणाच्या पुनर्वसनाला शासनाने मंजुरी दिली आहे. पैसा आणि वर्धा रोडच्या पूर्वीकडे पुनर्वसन होणार आहे. या संदर्भाततील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सर्वे नं 227 आणि 228 मधील 3.22 हेक्टर जमीन भूसंपादन करायची आहे. भूसंपादनापूर्वी ही जमीन मिहानच्या नावाने होती. त्यामुळे भूसंपादनात अडचणी निर्माण झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने आता रेकॉर्ड दुरुस्ती केली. जोपर्यंत मिहानकडून भूसंपादनाचा निधी येणार नाही, तोपर्यंत कलम 19/3ची कारवाई करता येत नाही, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

मिहानकडे निधी तयार आहे. तो जिल्हाधिकार्‍यांकडे वर्ग केल्यानंतर लगेच भूसंपादनाची कारवाई होऊन पैसे वाटप केले जातील. या कारवाईसाठ़ी 2 महिन्यांचा अवधी लागणार आहे. झोपडपट्टीचाही पुनवर्सनात समावेश केला जाणार आहे. भूखंड वाटपासाठ़ीची यादी तयार आहे. या यादीवर 124 आक्षेप आले असून भूसंपादन कार्यालयाकडे ते पाठविण्यात आले. आक्षेप निकाली निघाले की आठवडाभरात प्लाट वाटपही करण्यात येणर आहे. शेतकर्‍याला 3000 चौ. फूट, शेतकरी नसेल त्याला 1500 चौ. फूट आणि अतिक्रमणधारक असेल तर त्याला 1000 चौ. फूट प्लॉट दिला जाईल. बांधलेले घर पुनवर्सनाच्या जागेवर स्थलांतरित करण्यात येईल. त्यासाठी ट्रक आणि 10 हजार रुपये मिहानकडून देण्यात येतील.

गावठाणाची हद्द ठरवताना नगर भूमापन विभागाने काही चुका केल्या आहेत, त्या सुधारणे आवश्यक आहे. यासाठ़ी पुन्हा मोजणी करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. नागरी सुविधा मिहानने त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नवीन जागेचे पट्टेवाटपही लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले. या भागात असलेली म्हाडाची कॉलनी मिहानला हस्तातरित करण्यात आली आहे. पुढच्या वर्षभरात संपूर्ण गाव नवीन जागेवर वसलेले असेल. ज्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळाले, पैसे मिळाले, त्यांची जागा मिहानने ताब्यात घ्यावी. तसेच ज्यांना घरे मिळाली पण त्यांनी भाड्याने दिले असेल तर भाडेकरू रिकामे करावे असेही सांगण्यात आले.