Published On : Fri, Jan 24th, 2020

शहरातील दृष्टिबाधित, मूक-बधिर विद्यार्थ्यांनी केला मेट्रो प्रवास

Advertisement

नागपूर – मेट्रो सेवा सुरु झाल्याने सर्व सामान्य नागपूरकरांकरता प्रवास सोपा झाला असताना, शहरातील विविध संघटनांचे आणि घटकांचे प्रतिनिधी देखील याचा लाभ घेत आहेत. याच शृंखलेत, शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभे राहण्यास मदत करीत असलेल्या आणि या करता आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवणाऱ्या संस्थांनी देखील संबंधितांचा मेट्रो प्रवास घडवून आणला. शहरातील दृष्टीबाधीत तसेच मूक-बधिर युवकांनी नुकतंच शहराचे मानचिन्ह ठरत असलेल्या मेट्रोने प्रवास करत एक वेगळा अनुभव घेतला.

नागपुरातील आशादीप स्नेही मंडळातर्फे दृष्टीबाधीत विद्यार्थी आणि तरूणांकरता हा प्रवास आयोजित केला होता. सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि पार्टीचा प्रवास असा हा छोटेखानी दौरा आयोजित करण्यात आला होता. एकूण ४० विद्यार्थ्यांवर दृष्टीबाधीत विद्यार्थी, संस्थेचे सदस्य आणी फोकस ग्रुपचे विद्यार्थी व शिक्षक असे एकूण 80 जणांचा या दौऱ्यात सहभाग होता. दृष्टीबाधित असलेल्या विद्यार्थ्यांकरिता हा प्रवास म्हणजे एक वेगळीच अनुभूती होती. अनेकांकरता हा मेट्रोचा पहिलाच प्रवास होता. स्पर्शाने त्यांनी मेट्रो गाडीची वैशिष्ट्ये जाणून घेतली.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसोबतच, शहरातील चीटणवीस ट्रस्टतर्फे राबवण्यात येणाऱ्या `प्रणव प्रकल्प’ आणि `अक्षर प्रकल्प’ अंतर्गत अनुक्रमे १ ते ५ तसेच १० ते १४ वर्षाच्या मूकबधिर विद्यार्थ्यांकरिता मेट्रो राईडचे आयोजन केले होते. सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि परत असा दौरा या विदयार्थ्यांनी केला. या संस्थेने मुख-बधिर विद्यार्थ्यांना मेट्रोची फेरी घडवून आणली.

एक ते पाच वर्ष वयोगटातील चिमुरडी आपल्या पालकांसोबत आली होती तर दुसऱ्या वयोगटातील विद्यार्थी आपल्या शिक्षकांसोबत आली होती. ह्याच धर्तीवर खापरखेडा येथून चाहूल वस्तीशाळेची ३० मुले माझी मेट्रोने प्रवास करण्यास नागपुरात आली होती. शिक्षणाद्वारे समाजात समानता स्थापित करण्यासाठी सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना सशक्त करण्यासाठी व त्या विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि माध्यमिक पातळीवरील शिक्षण देण्यासाठी “चाहूल वस्तीशाळा” काम करते. ह्या विद्यार्थ्यांनी देखील नागपूर मेट्रोचा प्रवास करून त्यांचा आनंद व्यक्त केला.

प्रवासी वाहतूक सुरु झाल्यानंतर नागपूरकर मेट्रोने सातत्याने प्रवास करीत आहेत, सामान्य नागरिकांशिवाय अश्या विशेष लोकांचा नागपूर मेट्रोने प्रवास हा महामेट्रोसाठी देखील विशेष प्राप्तीचा आणि आनंदाचा विषय आहे

Advertisement
Advertisement