Published On : Fri, May 27th, 2022

मेट्रोच्या वेळापत्रक मध्ये बद्दल

Advertisement

आता दर रविवारी रात्री १० वाजता पर्यंत मेट्रो सेवा

नागपूर: एक्वा आणि ऑरेंज लाईन या दोन्ही मार्गावरील मेट्रो सेवा या रविवार (२९ मे २०२२) पासून वाढवण्यात येत आहे. सुधारित वेळापत्रकानुसार या दोन्ही मार्गिकेवरील टर्मिनल स्टेशन येथून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ९.३० ऐवजी रात्री १० वाजता पर्यंत उपलब्ध असेल.

नागरिकांची सातत्याने होणारी मागणी बघता वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रवासी रविवार सुट्टीचा दिवस बघता खरेदी किंवा अन्य कार्य ठिकाणी जात असून मेट्रो प्रवाश्याची मागणी होती, त्यामुळे या मेट्रो सेवा रात्री ९.३० वाजताच्या ऐवजी रात्री १० वाजता पर्यंत सुरु राहणार.

आत्तापर्यंत, प्रवासी सेवा सकाळी ६.३० वाजता पासून रविवारसह सर्व दिवस रात्री ९.३० पर्यंत सुरू असते, परंतु आता रविवार या दिवशी मेट्रो सेवा रात्री १० वाजता पर्यंत असेल. मेट्रो सेवा रविवारी सकाळी ६.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत दर २० मिनिटांनी उपलब्ध असेल, तसेच दुपारी १२ ते रात्री ९ वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी आणि रात्री ९ ते १० या दरम्यान मेट्रो सेवा दर २० मिनिटांनी उपलब्ध असेल.

सर्वानी नोंद घेण्यात यावी कि, मेट्रो सेवेमध्ये सदर बदल फक्त रविवार या दिवसा करता करण्यात आलेले असून इतर दिवशी मेट्रो सेवा आणि वेळ पूर्वीप्रमाणेच राहतील, वर नमूद केल्याप्रमाणे प्रवाशांची गरजा लक्षात घेता मेट्रो ट्रेनच्या वेळ मध्ये बदल करण्यात आले आहेत. नागपूरकरांनी मेट्रो सेवेच्या वाढलेल्या वेळेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन महा मेट्रो करित आहे. या वाढीव फेऱ्यांचा नागपूरकरांना नक्कीच फायदा होणार आहे.