Published On : Sat, Nov 23rd, 2019

कल्याण मूक बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा केला मेट्रोने प्रवास

नागपूर: रेशीमबाग स्थित कल्याण मूक बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी आणि खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रोने प्रवास केला. हा प्रवास मूक बधिर विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. एलिव्हेटेड सेक्शनवरून मेट्रोने प्रवास करतांना शहराचे आधुनिक स्वरूप आणि देखावे विद्यार्थ्यांनी पाहिले, मेट्रोच्या खिडकूतून हे दृश्य पाहत असतांना विद्यार्थ्यांनी सेल्फी काढली. संपूर्ण प्रवासात साइन लँग्वेजच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत विद्यार्थी आनंद व्यक्त करत होते.

विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच मेट्रोतुन प्रवास केला. प्रवास करतांना मेट्रोचे विविध स्टेशन, स्टेशनचे आंतरिक आणि बाहेरील बांधकाम, स्टेशनवरील कलाकृती ई. विद्यार्थ्यांनी पाहिले. मेट्रोच्या प्रवासाने विद्यार्थ्यांनमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता. यामुळे शिक्षकांनी आनंद होत होता.

प्रवासात महा मेट्रोतर्फे संपूर्ण सहकार्य या विद्यार्थ्यांना करण्यात येत होते. अशी प्रतिक्रिया मूक बधिर विद्यालयाच्या शिक्षकांनी व्यक्त करत सहकार्याबद्दल महा मेट्रोचे आभार मानले.

मूक बधिर विद्यालयातील पाहिले ते बारावी पर्यंतचे शंभरहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकारी/कर्मचारी यात सहभागी होते. नियमांचे पालन करीत अगदी शिस्तीने सर्व विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण प्रवास अनुभवला. पुन्हा मेट्रोतून प्रवास करण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमोर व्यक्त केल्या. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण करू असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.