Published On : Mon, Dec 20th, 2021

हिंगणा मार्गावरील मेट्रो सर्वदृष्टीने उपयुक्त – उपप्राचार्य

Advertisement

सीताबाई नरगुडकर नर्सिंग कॉलेज येथे मेट्रो संवाद

नागपूर : हिंगणा येथील मौजा सुकळी भागात असलेल्या सीताबाई नरगुडकर नर्सिंग कॉलेजमध्ये मेट्रो संवाद आयोजित करण्यात आला होता. हे महाविद्यालय महा मेट्रोच्या रिच-३ अँक्वा लाईन मार्गिकेवर असून. नागपूर शहरातून या महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनी आणि शिक्षकांची संख्या मोठी आहे.

या अनुषंगाने प्रवासादरम्यान मिळणाऱ्या सोयी-सवलतींबद्दल माहिती देऊन त्यांच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन याप्रसंगी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले.

उपस्थित विद्यार्थ्यांना नागपूर मेट्रोबद्दल प्राथमिक माहिती दिल्यानंतर त्या भागातील मेट्रोमध्ये आणि स्थानकांवर मिळणाऱ्या सुविधा, तिकीट भाडे, पोहचण्यासाठी लागणार कमी वेळ शिवाय आरोग्य आणि पर्यावरणासाठी अनुकूल असणाऱ्या या सार्वजनिक परिवहनाबद्दल सविस्तर माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. या महाविद्यालयात महिलांची संख्या जास्त असल्याने महिलांसाठी असलेली सुरक्षितता देखील त्यांना सांगण्यात आली. याशिवाय जवळचे स्टेशन कुठले, फीडर सेवा, फस्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, मेट्रो सुरु करण्याचे उद्देश तसेच मेट्रो प्रवासी सेवेची फ्रिक्वेन्सी असे प्रश्न विद्यार्थ्याने मेट्रो अधिकाऱ्यांनकडून संवादच्या माध्यमाने जाणून घेतले. तसेच रिच ४ मध्ये लवकरात लवकर मेट्रो सुरु व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी मेट्रो मेट्रो अधिकाऱ्यांना केली.

उपस्थित विद्यार्थ्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू आणि हिंगणा मार्ग हा एक प्रमुख मार्ग आहे. या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ व सिताबर्डी,शंकर नगर,सुभाष नगर तसेच एमआय डिसी इत्यादी असे प्रमुख शैशणिक,औद्योगिक आणि व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून,मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे.