Published On : Fri, Aug 21st, 2020

स्क्रॅप इ टेंडरचा भ्रष्टचारात मेट्रो अधिकाऱ्याची भूमिका मुखदर्शक

मेट्रोच्या स्क्रॅप इ टेंडर मध्ये भ्रष्टचार

स्क्रॅप जास्त किंमतीत घेऊन स्वस्त दरात विकनारे अजब टेंडरधारक

कन्हान : नागपूर मेट्रो लाईनच्या कामामध्ये कोठ्यावधील रुपयांचा लोहा वापरण्यात आला. वापरलेल्या लोह्या मध्ये हजारो टन लोहा वाचला या लोह्याची ऑनलाइन इ टेंडरिंग करण्यात आली. इ टेंडरिंग मध्ये हजारो टन स्क्रॅपच्या लोह्याची प्रति ३२ रुपये किंमत लाविण्यात आली.


हे टेंडर दिल्ली येथील कंपनीला मिडाले असून टेंडर धारकांनी विकत घेतलेला स्क्रॅपचा लोह्याचा माल २२ रुपये प्रति किलोच्या भावाने विकले आहे. जास्त किमतीत स्क्रॅपचा माल घेऊन स्वस्त दरात विकणारे हे टेंडर धारक अधिकाऱ्यांशी साठ गाठ करून वजन काट्यात तांत्रिक जुगाड करून भ्रष्टचार करीत आहेत.

अशाच प्रकार फेब्रुवारी महिन्यात वाडी येथील ऑडनेस फॅक्टरी मध्ये घडला होता ज्यात प्रकरणात वाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. असाच प्रकार पुन्हा मेट्रो येथे सुरू असून यात मोठे मोठे अधिकारी लिप्त असल्याची बाब बोलली जात आहे. याची तात्काळ चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांनी केली आहे.