Published On : Wed, Apr 25th, 2018

साची बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर आधारित मेट्रोचे न्यू-एयरपोर्ट स्टेशन

Metro-New-Airport Station

नागपूर: नागपुर मेट्रोच्या न्यू-एयरपोर्ट स्टेशनवर उभारण्यात आलेली गौतम बुद्धाची मूर्ती आणि स्टेशनचे निर्माण प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणारे ठरते. भारताच्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील साची येथील जगप्रसिद्ध बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर या मेट्रो स्टेशनचे निर्माण करण्यात आले आहे. ई.स. पूर्व तिसऱ्या शतकात मोर्य सम्राट अशोका यांच्या पत्नीने साची येथे भव्य स्तूपाचे निर्माण करून शांतीचा मार्ग जगाला दाखवला. भारताच्या या गौरवशाली इतिहासाची ओळख प्राप्त करून देण्याचा संकल्प महा मेट्रोने केला आहे. नुकतेच झालेल्या नागपुर मेट्रोच्या प्री-लॉन्च जॉय राइड दरम्यान न्यू-एयरपोर्ट स्टेशनवर उभारण्यात आलेली गौतम बुद्धाची आकर्षक प्रतिमा पाहून नागरिकांनी या संकल्पनेची प्रशंसा केली.

उल्लेखनीय म्हणजे स्टेशनवरील प्लैटफॉर्मपासून ४० मीटर उंचीवर बसविण्यात आलेल्या या डोम चा व्यास १३.५ मीटर असून डोम ची उंची ८.५ मीटर इतकी आहे. २०० टन वजन उचलण्याची क्षमता असलेल्या क्रेनच्या मदतीने हा २३ टन वजनी डोम बसविण्यात आला आहे. डोम चे डिजाईन तैयार करण्यापासून तर ते बसविण्यापर्यन्तचे कार्य ६ महिन्यात पूर्ण झाले. २० ते २५ कुशल कारागीरांच्या साह्याने हे कार्य पूर्ण करण्यात आले. डोम तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टिल धातुचा वापर करण्यात आला.पावसाच्या पाण्यामुळे डोमवर कुठलाही परिणाम होऊ नए याचीही काळजी घेण्यात आली. याच्या रखरखाव वर कोणताही खर्च लागत नसून ते पूर्णपणे मेंटेनेन्स फ्री आहे. डोमच्या आतील भागात पॉलीकार्बोनेट चा उपयोग झाला असल्याने अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून संरक्षण मिळेल. स्टेशन परिसरात व डोमच्यामध्यभागी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीची निर्मितिकरता सैण्ड स्टोनचा वापर झाला आहे.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

GAUTAM_BUDDHA_PRATIMA

न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन चे बांधकाम आधुनिक आर्किटेक पद्धतीने झाले असून यात क्रीम(Cream) कलरच्या टाइल्सचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. स्टेशनवर बसविलेले आधुनिक टेराकोटा टाईल्स अनेक वैशिष्ट्याने परिपूर्ण आहे. यामुळे स्टेशनचे वातावरण नियंत्रणात राहते. कुशल कारागिराच्या माध्यमातून याठिकाणी तापमान नियंत्रण ठेवणारे टेराकोटा टाईल्स बसविण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement