Published On : Wed, Apr 18th, 2018

भरधाव ट्रेलरच्या धडकेत मार्शलचा मृत्यू

Road Accident
नागपूर: भरधाव ट्रेलरच्या धडकेत बुधवारी नागपूर मेट्रोच्या एका मार्शलचा मृत्यू झाला. सोनेगाव उड्डाणपूलाखाली बुधवारी रात्री १२:३० वाजता चिंचभवनजवळ हा अपघात झाला. मेट्रोचा मार्शल वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी उभा असताना चालकाने निष्काळजीपणामुळे त्याला उडवले. सदर ट्रेलर क्रमांक एन.एल. ०२ /एन/१३२५ हा जामठा येथून गर्डर लोड करून अजनी चौकातील मध्यवर्ती कारागृहाकडे निघाला होता. अपघातानंतर ट्रेलरचा चालक फरार झाला आहे.

पांडुरंग रुपाजी मडावी निवासी दाते नगर, सक्करदरा यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.