नागपूर : राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काटोल रोड चौकातील ग्रीन ऑरेंज सेलिब्रेशन हॉल येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून सेंटर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, सिम्बॉयसिसचे संचालक डॉ. समीर पिंगळे होते. मंचावर रातुम नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य रमेश चोपडे, पश्चिम नागपूर भाजप मंडळ अध्यक्ष अमर खोडे, नरेश बरडे, सरपंच पंकज साबळे, प्रगती पाटील, परिणिता फुके, निशांत गांधी, जयती वासुदेव, तरन्नुम खान, दुर्गादास जिचकार, किशोर भागडे, रेखा वांढे, भूमिका हिवसे, अनिल देव, गिरीश ग्वालबंशी, श्रुती देशपांडे, गुड्डू खान, डॉ. डोंगरवार, सुधीर कपूर, प्रिती तायडे, सुरेश कोंगे, विनय कडू, सिमरन कौर, प्रिती कश्यप, वर्षा जोसेफ, नूतन सिरीया, प्रमोद राऊत, चेतन कोलते, सुपिओ सरकार, कृष्णा पांडे, संजय हेजीब, मुकेश मिश्रा, संतोष यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य मार्गदर्शक डॉ. समीर पिंगळे यांनी ‘करिअरचा मार्ग’ या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ. वैशाली चोपडे यांनी या सत्कार सोहळ्यामागील उद्देश स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजन साकारदृष्टी सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. वैशाली चोपडे व रातुम नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य रमेश चोपडे यांनी केले होते. आयोजन समितीमध्ये अश्विनी ठोंबरे, प्रिती तायडे, रिंकू इंगोले, विष्णू वाकोडे, प्रियंका चोपडे, नीता चोपडे आदींचा समावेश होता.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचे स्वागत साकारदृष्टी सोशल फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले. डॉ. समीर पिंगळे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अंश रंधे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.