Published On : Fri, Dec 8th, 2017

नागपूर महानगरपालिका व चीनचे जिनान शहर यांच्यात सामंजस्य करार


नागपूर: माहिती तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी चीनमधील अग्रक्रमांकावर असलेले जिनान शहर आणि नागपूर महानगरपालिका यांच्यात शुक्रवारी (ता. ८ डिसेंबर) मनपा मुख्यालयात सामंजस्य करार झाला.

याप्रसंगी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, अतिरिक्त आयुक्त आर.झेड. सिद्दीकी, इंडिया चायना फ्रेन्डशीप असोसिएशनचे (आयसीएफए) अध्यक्ष (आल इंडिया) डॉ. जी.एच.फर्नांडिस, आयसीएफए महाराष्ट्र सचिव विशाखा मोरे, नागपूर विभागीय अध्यक्ष सीए सुनील चोखारे, जिनान मुन्सिपल कमिटीच्या अध्यक्षा लि जेई, कार्यकारी सचिव जियांग लिन, जिनान इन्व्हेसमेंट प्रमोशन ब्युरोचे संचालक झांग जून, जिनान फारेन ऍन्ड ओव्हरसिस अफेअर आफिसचे उप संचालक लियु झ्युडांग, जिनान म्युनसिपल कमिटीच्या सेक्शन चिफ सिया फेंग, जिनान फारेन अफेअर भाषांतर केंद्राचे उप संचालक लि यावतिंग यांची उपस्थिती होती.


इंडिया चायना फ्रेन्डशीप असोसिएशनतर्फे यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. या सामंजस्य करारानुसार चीनमध्ये आयटी क्षेत्र, आयटी मॅन्युफॅक्चरिंगसाठी ओळखल्या जाणा-या जिनान शहरासोबत माहिती तंत्रज्ञान आणि आयटी उत्पादनाच्या तंत्रज्ञान, इन्फ्रा, संस्कृती आणि युथ एक्सचेंग कार्यक्रम राबविण्यात येईल.