Editor in Chief : S.N.Vinod    |    Executive Editor : Sunita Mudaliar
| |
Published On : Mon, Jul 23rd, 2018

मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’ची पहिली विजेती 18 लाख 60 हजारांची रोख रक्कम आणि खोपोलीत एक अलिशान घर बक्षीस म्हणून मिळणार आहे.

मुंबई : अभिनेत्री मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’ची विजेती ठरली आहे. मराठी बिग बॉसच्या विजेतेपदाचं मुकुट कुणाच्या डोक्यावर चढणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर मेघा धाडेने आपणच बिग बॉसच्या घरात ‘बॉस’ असल्याचे दाखवून दिले आहे.

तर अभिनेता पुष्कर जोग बिग बॉसचा उपविजेता ठरला आहे. मेघा धाडेसह पुष्कर जोग, सई लोकुर, स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे हे टॉप-6 मध्ये होते. मात्र एक-एक करत तेही घराबाहेर पडले. त्यानंतर केवळ पुष्कर जोग आणि मेघा धाडे टॉप-2 होते. त्यातील अभिनेता पुष्कर जोग स्पर्धेतील रनर अप ठरला आणि मेघा विजेती ठरली.

बक्षीस काय मिळणार?

मेघा धाडे विजेती ठरल्याने, तिला 18 लाख 60 हजारांची रोख रक्कम आणि खोपोलीत एक अलिशान घर बक्षीस म्हणून मिळणार आहे.

18 स्पर्धक आणि 100 दिवस
बिग बॉसच्या घरात सुरुवातीला म्हणजे 15 एप्रिल रोजी 15 जण होते, नंतर वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून तीन जण घरात गेले, म्हणजेच एकूण 18 जण बिग बॉस होण्याच्या स्पर्धेत होते. एलिमेनेशनच्या माध्यमातून एक-एक करत घराबाहेर पडत गेले. गेले शंभर दिवस या स्पर्धेला रंगत आली होती.

बिग बॉसच्या घरातील भांडणं, फ्लर्टिंग, ग्रुप, टास्क इत्यादी गोष्टी कायमच चर्चेचे विषय ठरले.

महेश मांजरेकरांच्या सूत्रसंचालनाचंही कौतुक
मराठी मनोरंजन विश्वाचे बिग बॉस असलेल्या महेश मांजरेकर यांच्या हाती ‘ मराठी बिग बॉस’ची सूत्रं होती. बिग बॉसच्या घरातील घडामोडींप्रमाणेच शनिवार आणि रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या महेश मांजरेकर यांचीही प्रेक्षक आवर्जून वाट पाहत. प्रत्येक स्पर्धकाच्या चांगल्या-वाईट गोष्टी बेधडकपणे ते सांगत. त्यामुळे त्यांच्या सूत्रसंचालनाची सुद्धा मोठ्या प्रमाणात स्तुती झाली.

Bebaak
Stay Updated : Download Our App