Published On : Sat, Sep 2nd, 2017

शेतकऱ्आयांच्या समस्या चा तोडगा काढण्या करिता आमदार रेड्डी यांची मंत्री महोदय सोबत बैठक

रामटेक/नागपुर: आमदार डि. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या अथक प्रयत्नाने धान उत्पादक शेतकरी व इतर शेतकरी यांचा तोडगा काढण्यासाठी मा. ना. श्री.देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म. रा. यांच्या कडे आज बेठक लावून जिल्हातील सर्व शेतकरी यांच्या हिताकरिता चर्चा केली असता चौराई धारण मुळे उद्भवत असलेल्या समस्यांवर उपाययोजनांना मंजुरी देऊन ED यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगितले तसेच महानगर पालिका यांच्या साठी स्वतंत्र धरण कोलार नदी येथे बांधणार आहे.

मा. आमदार श्री.डि.मल्लिकार्जुन रेड्डी साहेब यांच्या सांगितलेल्या उपयोजनांवर सुद्धा अंमलबजावणी होणार असून पेंच संभागातील शेतकऱ्यान करिता तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी सिंचन विहीर व विंधन विहीर करीता जलसंधारण विभागा कडून करण्याकरिता शासन निर्णय घेणार आहे. तसेच राष्ट्रीय नदी जोडो अभियान अंतर्गत मा.ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब व मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व तसेच केंद्रीय मंत्री उमा भारतीजी यांना बोलवून जिल्हातील पाण्याची समस्या सोडविण्या करिता लवकरच बेठक घेणार आहे.

शेतकऱ्याच्या या सर्व बाबींवर लवकरच उपायोजना होणार असून या बेठकीत मा.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म.रा.व मा.ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा तसेच मा. आमदार श्री.डि. मल्लिकार्जुन रेड्डी साहेब आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र इत्यादी सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.