| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Feb 7th, 2018

  नगर रचना परियोजनेची माहिती देण्यासाठी ८ फेब्रुवारीला पुनापूर येथे बैठक


  नागपूर: लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूरक शहरे तयार करण्यासाठी केंद्र शासनातर्फे ‘स्मार्ट सिटी अभियान’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर शहरात भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी अंतर्गत १७३० एकर क्षेत्रात नगर रचना परियोजना राबविण्याचे आणि तयार करण्याचे कार्य नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनतर्फे करण्यात येत आहे.

  या योजनेविषयी माहिती देण्यासाठी गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी पुनापूर येथील भवानी माता मंदिर सभागृहात दुपारी १२.३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीला प्रस्तावित नगर रचना परियोजना क्षेत्रातील सर्व जमीन मालक, भोगवटदार, मिळकतीमधील हितसंबंधी आदींनी स्वत: किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145