Advertisement
कामठी :-आगामी पर्व येणारे रमजान ईद सामाजिक सालोख्याचे भान ठेवीत कोरोना च्या काळात हा रमजान ईद पर्व घरूनच साजरा करण्यात यावा या मुख्य उद्देशाने पोलीस व नागरिकांत वैचारिक आदान प्रदान व्हावा व रमजान ईद पर्व योग्यरीत्या साजरा करण्यात यावा यासाठी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे , दुय्यम पोलीस निरीक्षक काळे यांच्या मुख्य उपस्थितीत शांतता समिती ची बैठक आयोजित करण्यात आली होतो.
या बैठकीला कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेश दुबे,नगरसेवक प्रतीक पडोळे, ऍड पंकज यादव, विनोद वाढवानी, प्रदीप सपाटे, पोलीस पाटिल, उदास बन्सोड, नितु दुबे, पत्रकार नंदू कोल्हे, प्रदीप साखरकर आदी उपस्थित होते.या बैठकीचे संचालन व आभार गुप्त विभागाचे मयूर बन्सोड यांनी केले.