Published On : Sat, Sep 1st, 2018

तहसील कार्यालय रामटेक येथे ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात सभा संपन्न .

Advertisement

रामटेक शहर प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्यातील माहे आक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतिच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांचे दवारे जाहीर करण्यात आला असून रामटेक तालुक्यातील 28 ग्रामपंचायतिसाठी व 1ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणुक असल्याने आचारसंहिता दि 23/08/2018 पासून लागू करण्यात आली आहे.

निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून निवडणूकिचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील या अनुषंगाने तहसीलदार कार्यालय रामटेक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्येकर्ते,पत्रकार, प्रिंटर्स पोलीस निरीक्षक दीपक वंजारी,नायब तहसिलदार तथा नोडल अधिकारी एस डी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

या सभेत निवडणुकी संदर्भात तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी धर्मेश पुसाटे परिपूर्ण माहिती दिली व निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन केले आहे.निवडणूकीसाठी सरपंच पदासाठी ग्रा प सदस्य 9 उमेदवार असलेल्या ग्रा.प.साठी 50,000 रुपये खर्च,13 साठी 100000 रुपये खर्च,17 साठी 175000 रुपये खर्च सरपंच पदासाठी उभे राहणाऱ्या ना करता येईल.

ग्रा प सदस्य संख्या 7ते9असलेल्या प्रति सदस्याला 25000रुपये खर्च,11ते13 साठी 35000रुपये खर्च,15ते17 साठी 50000रुपये खर्च उमेदवार पदासाठी उभे राहणाऱ्याना खर्च करता येईल.

मतदान प्रक्रिया12 तारखेपासून सुरू होणार असून 12 तारखेला छाननी 15 तारखेला 3 वाजेपर्यंत विद्राल,15 तारखेला 3नंतर चिन्ह वाटप 26 तारखेला मतदान आणि 27 तारखेला काउंटनिग होणार आहे.28 सार्वत्रिक निवडणुका व 1 पोटनिवडणुक असून निर्भयपणे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ व मजबूत करून आदर्श आचार संहितेचे पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी धर्मेश पुसाटे यांनी केले आहे.