नागपूर. पदवीधर मतदार संघ नागपूर विभागाचे भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग २६मध्ये उद्या शनिवारी (२८ नोव्हेंबर) पदवीधरांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
प्रभाग २६ मधील संत गोरोबा कुंभार समाज भवन येथे सायंकाळी ६ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम हे मेळाव्याचे आयोजक आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, नगरसेवक जितेंद्र (बंटी) कुकडे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, प्रमोद पेंडके, संजय अवचट आदी उपस्थित राहतील.
मेळाव्याच्या आयोजनासाठी राजेश संगेवार, सुरेश बारई, अशोक देशमुख, प्रशांत मानापुरे, प्रवीण बोबडे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
