Published On : Fri, Nov 27th, 2020

चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा ठरेल भाजपच्या विजयाचा शिल्पकार : माजी मंत्री हंसराज अहीर

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात विजय संकल्प मेळावा

चंद्रपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात नागपूरनंतर चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर, गडचिरोली हे दोन्ही जिल्हे भाजपचा गड आहेत. पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार हे दोन्ही जिल्हे ठरतील, असा विश्वास माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला.

Advertisement

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, खोरिपचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, गडचांदूर, राजुरा आदी ठिकाणी विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गडचांदूर आणि राजुरा येथील मेळाव्यात ते बोलत होते.

याप्रसंगी मंचावर भाजपचे उमेदवार संदीप जोशी, भाजप जिल्ह्या अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा उपस्थित होते.

श्री. हंसराज अहीर यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला किमान २० मतदारांपर्यंत पोचून भाजपचा विजय सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. विविध ठिकाणच्या मेळाव्याला खासदार अशोक नेते,

माजी आमदार अतुल देशकर, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा, सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, जि.प. सदस्य योगीता डबले, पं. स. सभापती अल्का आत्राम, समीर केणे, युवा मोर्चा अध्यक्ष आशीष देवतळे, जि.प. सदस्य संतोष तंगडपल्लीवर, पं. स.सदस्य रावजी बोलीवर, शहर अध्यक्ष आशीष कार्लेकर, सतीश बोम्मवार, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, गणपती चौधरी, प्राचार्य निखाडे, दीपक सातपुते, गजानन गोरंटीवार, नीलेश संगमवार, नीलेश पुलगमकर आदी उपस्थित होते.

विजय हेच ध्येय : देवराव भोंगळे
पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या विजयासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सुक्ष्मनियोजन करण्यात आला आहे. प्रत्येक कार्यकर्ता मतदारांपर्यंत पोचत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जे काही मतदान होईल ते १०० टक्के भाजपला राहील असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिला.

कार्यकर्त्याला नेता करण्याची ताकद भाजपातच : संदीप जोशी
भारतीय जनता पार्टी जात बघत नाही. या पक्षासाठी सर्व जाती धर्माचे लोकं सारखेच आहेत. मी ही कधीकाळी सामान्य कार्यकर्ता होतो. सामान्य कार्यकर्त्याला पद देण्याची ताकद केवळ भारतीय जनता पार्टीतच आहे.प्रत्येक जातीच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याची ताकद भाजपातच आहे. म्हणून सामान्य कार्यकर्ता, नागरिक भाजपसोबत आहे आणि हीच भाजपची ताकद आहे, असे म्हणत या निवडणुकीत पहिल्या पसंतीचे मत देऊन भाजपला विजयी करा, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement