– जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या मुलाखती होणार
नागपूर– नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ७ जानेवारी २०२० रोजी होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी नागपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीच्या निवड समितीची बैठक मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होईल.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ (नागपूर) येथील कार्यालयात सकाळी १० ते ४.३० या कालावधीत नागपूर जिल्हा (ग्रामीण) मधील सहाही विधानसभा क्षेत्रात मोडणाºया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलमध्ये काँग्रेस पक्षांकडून निवडणूक लढू इच्छिणाºया उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. जिल्हा कॉँग्रेस कमिटीकडून इच्छुक उमेदवारांकडून गत महिन्यात उमेदवारी अर्ज मागविले होते. यास नागपूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
नागपूर जिल्हा परिषदेवर यावेळी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करण्याचा संकल्प जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केला आहे. यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीला समोरे जाण्यास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संमती दर्शविली आहे.
१० डिसेंबर रोजी होणारी जिल्हा निवड समितीची बैठक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला प्रदेश कॉँग्रेस कमिटीने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरीक्षक, आजी-माजी राज्यसभा आणि विधानपरिषद सदस्य, जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, जिल्ह्यातील प्रदेश कॉॅँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, संबंधित विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविणारे कॉँग्रेसचे उमेदवार, जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते, ब्लॉक अध्यक्ष (त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाºया जि.प. व पं.स.सर्कलसाठी), जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यु.आय., इंटक, अल्पसंख्याक विभाग, अनुसूचित जाती, जमाती आघाडीच्या जिल्हा अध्यक्षांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गंगाधर रेवतकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कसाठी
विधानसभा मतदार संघानुसार वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील –
मतदार संघ वेळ
काटोल सकाळी १० ते ११
रामटेक सकाळी ११ ते १२
सावनेर दुपारी १२ ते १
उमरेड दुपारी १.३० ते २.३०
कामठी दुुपारी २.३० ते ३.३०
हिंगणा दुपारी ३.३० ते ४.३०